राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच; सुजय विखे पाटलांचं स्पष्टीकरण

अहमदनगर – विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे आज नगरमधील नरेंद्र मोदींच्या सभेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करणार अशी सर्वत्र चर्चा होती, मात्र राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार नाहीत, असा खुलासा त्यांचे पुत्र आणि दक्षिण नगरमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हा खुलासा दिला आहे. सुजय विखे म्हणाले, “माझ्या वडिलांचा विरोध हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. निवडणूक वैयक्तिक होत चालली होती. मला वैयक्तिक पातळीवर विरोध सुरू होता. ते लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला. जेवढं शक्य तेवढं वैयक्तिक पातळीवर सहभाग घेत ते मुलगा म्हणून माझा प्रचार करत आहेत, पण त्यांचा भाजपशी काही संबंध नाही.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)