जाणून घ्या महाराष्ट्रातील सात मंत्र्यांच्या वाट्याला कोणते खाते

नवी दिल्ली-  पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात 57 सदस्यांना स्थान मिळाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. मात्र, आज या सर्व मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाले असून, या सगळ्यात महाराष्ट्रातील सात मंत्र्यांच्या वाट्याला कोणती खाती आली आहेत. हे चित्र देखील आता स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांना खलील प्रमाणे खाते जाहीर झाले आहेत.

  • नितीन गडकरी – रस्ते आणि वाहतूक मंत्री
  • अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्री
  • पीयूष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री
  • प्रकाश जावडेकर – माहिती आणि प्रसारण, पर्यावरण
  • रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
  • संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
  • रावसाहेब दानवे – सार्वजनिक वितरण राज्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)