#ICCWorldCup2019 : वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

नॉटिंगहॅम : ओशेन थॉंमसच्या आणि जेसन होल्डर यांची प्रभावी गोलंदाजी आणि सलामीवीर क्रिस गेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडिजने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला आहे. सामना जिंकण्यासाठी असलेलं 106 धावांचं माफक आव्हान वेस्ट इंडिज संघाने अवघ्या 13.4 षटकांत 3 बाद 108 धावा करतं पूर्ण करत विश्वचषक स्पर्धेमध्ये विजयी सुरूवात केली आहे.

वेस्टइडिंज संघाकडून क्रिस गेलने 34 चेंडूत सर्वाधिक 50 धावा केल्या. डैरेन ब्रावो शून्यावर तर शाइ होप 11 धावांवर बाद झाला. तर निकोलस पुरनने 19 चेंडूत 34 आणि शमिरोन हेट्मेयरने नाबाद 7 धावा करत संघास विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजचा कर्णधार जेसन होल्डर यांने पाकिस्तान संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. त्यानंतर विंडिजच्या गोलंदाजीचा सामना करताना पाकिस्तानचा संघ 21.4 षटकांत सर्वबाद 105 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. पाकिस्तानकडून फखर जमान आणि बाबर आजम यांनी प्रत्येकी सर्वाधिक 22 धावा केल्या. तर मोहम्मद हफीजने 16 आणि वहाब रियाजने 18 धावा केल्या.

वेस्टइंडिज संघाकडून गोलंदाजीत ओशेन थाॅमसने सर्वाधिक 4 तर जेसन होल्डरने 3 गडी बाद केले. आंद्रे रसेलने 2 तर शेल्डन काॅटरेलने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×