भारतीय गुंतवणूकदारांना आयटी देणार साथ! (भाग-२)

भारतीय गुंतवणूकदारांना आयटी देणार साथ! (भाग-१)

या क्षेत्रातील घडामोडी व सुधारणा :

* नासकॉम (The National Association of Software and Services Companies) या राष्ट्रीय संघटनेनं ऑनलाइन प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे ज्याचा उद्देश २ दशलक्ष पेक्षा जास्त तंत्रज्ञ व्यावसायिकांना कुशल बनविणं व २ दशलक्ष संभाव्य कर्मचारी व विद्यार्थ्यांस निपुण बनवणं आहे.

* सरकारनं देखील या क्षेत्राची १२ चॅम्पियन सेवा पुरवठादार क्षेत्रांतर्गत दखल घेऊन या क्षेत्रासाठी सुमारे ५००० कोटी रुपयांच्या निधीची तजवीज केली आहे.

* २०१८-१९ च्या केंद्रीय बजेट नुसार, नीति आयोगानं कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व त्यातील सुधारणा यावर एक राष्ट्रीय कार्यक्रम आखण्याचं योजिलं आहे.

* साधारणपणे २०० भारतीय आयटी कंपन्या या एकूण ८० देशांमध्ये कार्यान्वित आहेत.

* मागील वर्षापर्यंत ११४० वैश्विक क्षमता केंद्रं (ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स) ही भारताबाहेर कार्यान्वित झालेली होती.

* मागील वर्षाच्या तिमाहीपर्यंत या क्षेत्रातील प्रायव्हेट इक्विटीद्वारे केली गेलेली गुंतवणूक होती २४०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स तर व्हेंचर कॅपिटल प्रकाराद्वारे केली गेलेली गुंतवणूक होती ५३ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स.

एकूणच, जगभरातील आयटी कंपन्यांसाठी भारत हा सर्वात मोठा बाहेरील स्रोत आहे. जागतिक ग्राहकांना त्यांच्या देशात जाऊन सेवा पुरवणं (on-shore) व भारतातून बाहेरील कंपन्यांना सेवा (off-shore) देण्याच्या क्षमतेत आपली क्षमता सिद्ध केल्यामुळं उदयोन्मुख तंत्रज्ञानातील सर्व श्रेणी आता भारतातील आयटी कंपन्यांसाठी उपलब्ध होत आहेत. २०१८-१९ मध्ये, माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा या क्षेत्रातील वाढ १८१ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या घरात पोहोचलेली आहे. तर या क्षेत्राची निर्यात १३७ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी आहे व या क्षेत्राचं (हार्डवेअर सहित) देशांतर्गत उत्पन्न हे वाढून ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचलंय. या क्षेत्रातील डिजिटल प्रकारातील उत्पन्न हे २०२५ पर्यंत ३८ टक्के गृहीत धरून तो आकडा ३५० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या घरात पोहोचण्याचा कयास या क्षेत्रातील तज्ज्ञ लावत आहेत.

पुढील एक वर्षांसाठी प्रति डॉलर भारतीय रुपयाचा भाव ६७.५ किंवा ६५.५ गृहीत धरल्यास बाजारातील अस्थिरतेमध्ये ह्या क्षेत्रातील निवडककंपन्यांचे शेअर्स हे सध्याच्या पातळीवरून त्यात टप्प्याटप्प्यानं गुंतवणूक करून आपल्या पोर्टफोलिओस बिकट परिस्थितीत हातभार लावण्यास नक्कीच कामी येतील असा माझा कयास आहे. त्यामुळं या क्षेत्रामधील नसलेल्याअशा एका कंपनीचं ब्रीदवाक्य इथं नमूद करावंसं वाटतं, “Profit from IT”.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)