हार्दिक पटेल यांना घेतले ताब्यात

सूरत – येथे नुकत्याच झालेल्या आग दुर्घटना प्रकरणात सूूरतचे महापोैर व अन्य अधिकाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हे दाखल केले जात नाहींत तो पर्यंत उपोषण करण्याचा इशारा देत घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न करणारे कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळानजिक धरणे आंदोलन करण्यासाठी कॉंग्रेसने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पण त्यांना ती नाकारण्यात आल्यानंतरही हार्दिक पटेल यांनी तेथे जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आगीच्या दुर्घटनेत 22 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पटेल यांना इच्छपोरे पोलिस स्टेशन मध्ये नेऊन ठेवण्यात आले आहे. दरम्यान हार्दिक पटेल यांनी घटनास्थळी गेल्या रविवारी भेट दिली होती. पण त्यांच्यावर त्यावेळी त्यांच्याच आंदोलनातील एका माजी सहकाऱ्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता वाटल्याने आम्ही त्यांच्या धरणे आंदोलनाला अनुमती दिली नाही असे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)