अमेरिकेत ग्रीन कार्ड मर्यादा विधेयक मंजुर

3 लाख भारतीयांना होणार फायदा

वॉशिंग्टन – अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करण्यास आवश्‍यक असणाऱ्या ग्रीन कार्डवर ट्रम्प सरकारने मर्यादा आणत प्रत्येक देशासाठी सात टक्‍के मर्यादा ठेवण्यात आली होती. या “ग्रीन कार्ड’वरील मर्यादा उठविण्याच्या विधेयकावर मंगळवारी मतदान घेत अमेरिकेच्या सिनेटने ग्रीन कार्ड जारी करण्यासंदर्भातल्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामुळे भारतातल्या हुशार आयटीयन्सना फायदा पोहोचणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेच्या आयटी क्षेत्रामध्ये हजारो भारतीय काम करत असून ते ‘ग्रीन कार्ड’ मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेने मंजूर केलेल्या या विधेयकामुळे प्रतिभावान आयटीयन्सना अमेरिकेत राहून काम करता येणार आहे. फेअरनेस ऑफ हाय स्कील इमिग्रेंट्‌स ऍक्‍ट 2019 किंवा एचआर 1044 नावाचे हे विधेयक 435 सदस्य असलेल्या सिनेटमध्ये 365 मतांनी पारीत झाले आहे. तर या विधेयकाच्या विरोधात 65 मते पडली. प्रत्येक वर्षी सर्वात जास्त भारतीय हे एच 1बी आणि एल व्हिसावर अमेरिकेला जातात. आकड्यांनुसार एप्रिल 2018पर्यंत अमेरिकेतल्या टेक्‍नोलॉजी क्षेत्रातील 3 लाख भारतीय असे आहेत की जे ग्रीन कार्डची वाट पाहतायत.

असा आहे नवा कायदा : अमेरिकी सिनेटने प्रत्येक वर्षी सर्वच देशातील 7 टक्के ग्रीन कार्ड जारी करण्याची सीमा संपवली आहे. आता सहजरीत्या अमेरिकेते ग्रीन कार्ड धारण केलेल्या लोकांना स्थायी स्वरूपात राहणे आणि काम करण्याची परवानगी मिळणार आहे. याचा हजारो आयटीयन्सला फायदा पोहोचणार आहे. बऱ्याच काळापासून जे लोक अमेरिकेत कायद्यानं राहू इच्छितात, त्यांचा आता दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)