उद्योगपती संजय घोडवत यांना पितृशोक

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचे प्रसिध्द व्यापारी दानचंद खिवराज घोडावत (वय 84) यांचे शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, उद्योगपती संजय घोडावत आणि उद्योगपती विनोद घोडावत यांचे ते वडील होत. सन 1950 साली व्यापाराच्या निमित्ताने घोडावत कुटुंबिय जयसिंगपूर इथे आले. छत्रपती शाहू महाराज यांनी जयसिंगपूर ही व्यापारपेठ सुरु केल्यामुळे दानचंद घोडावत यांनी याठिकाणी तंबाखू व्यापार सुरू केला होता. सामाजिक बांधीलकी जोपासत त्यांनी दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट स्थापना केली. ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना आजही मदत केली जाते. जयसिंगपूर इथं निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, सुना, नांतवंडे असा परिवार आहे. रविवारी सकाळी उदगांव वैकुठधाम येथे सकाळी नऊ वाजता अंत्यविधी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)