नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. वृत्तानुसार, काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.
दिल्ली-एनसीआर तसेच पंजाब हरियाणामध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाचे केंद्रबिंदू अफगाणिस्तान असल्याचे सांगितले जात आहे.
अफगाणिस्तानाची राजधानी काबूलच्या ईशान्य दिशेस भूकंप झाला. रिश्टर स्केलवर हिंदुकुशमध्ये भूकंपाची तीव्रता 6.8 नोंदविली गेली. भूकंप जमिनीपासून 255 किलोमीटर खाली होता.