उत्कृष्ट महाविद्यालय निवड ; प्रस्तावासाठी मुदतवाढ

विद्यार्थी विकास मंडळ संकेतस्थळावर भरता येणार माहिती

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्रभावी विद्यार्थी विकास मंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या उत्कृष्ट महाविद्यालय व विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी प्रस्ताव ऑनलाइन दाखल करण्यासाठी येत्या 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या सल्लागार समितीच्या सभेत ठरल्यानुसार महाविद्यालय व विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी 15 एप्रिलपर्यंत महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी आणखी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविद्यालयाने विद्यार्थी विकास मंडळाच्या मागील तीन वर्षात राबविलेल्या सर्व योजनांचे अहवाल पुरस्कारासाठी विचारात घेण्यात येणार आहेत.

विद्यार्थी विकास मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने माहिती भरायची आहे. या अर्जाची प्रिंट काढून त्यावर प्राचार्य किंवा संचालक, विद्यार्थी कल्याण अधिकारी यांची स्वाक्षरी असलेल्या व आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या प्रस्तावाची एक प्रत 27 एप्रिलपर्यंत विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ कार्यालयाकडे जमा करावी. मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, अशा सूचना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई यांनी पुणे, अहमदनगर, नाशिक मधील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)