आमच्या क्रिकेट संघावर बंदी घाला – पाकिस्तानी चाहत्याची कोर्टात धाव

लाहोर – भारत आणि पाकिस्तान दरम्यान विश्‍वचषक स्पर्धेत झालेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा संघ 89 धावांनी पराभुत झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघावर सगळीकडून टिका होत असताना पाकिस्तानी संघाच्या एका चाहत्याने थेट कोर्टात धाव घेतली असुन खराब प्रदर्शन करणाऱ्या आमच्या संघासहीत संघातील खेळाडू आणि निवड समितीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी त्याने याचिका अर्ज दाखल केला आहे.

भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांचे पारंपारीक शत्रु असुन दोन्ही संघांदरम्यानचे सामने हे युद्धा पेक्षा कमी नाहीत. त्यातच पाकिस्तानचा संघ विश्‍वचषकातील सामन्यात एकतर्फी पराभुत झाल्याने सगळीकडून त्यांच्या संघावर टिका केली जात असतानाच एका चाहत्याने उचललेल्या या पावलाची चर्चा होताना दिसून येत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरनवाला कोर्टाचुया न्यायाधिशांनी या याचिकेच्या पार्श्‍वभुमीवर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला एक नोटिस पाठवली आहे.

त्यातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आज होणाऱ्या मिटिंग मध्ये काही कठोर निर्णय होणार असुन ज्या द्वारे मॅनेजमेंट सह प्रशिक्षक आणि निवड समितीमध्ये अनेक बदल केले जाणार्त असल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनी जिओ न्युजने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)