अमित शाह आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : देशाचे नवे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या काश्मीरविषयीच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष आहे. असे असतानाच अमित शाह आज आणि उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान शहा अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधी गोष्टींचा आढावा घेतली. अमित शाहा या दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. तसेच फुटीरतावाद्यांविरोधात कडक भूमिका घेणार असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौऱ्यादरम्यान अमित शाह यांचा मुक्काम श्रीनगरच्या राजभवनात असणार आहे. तर पंचायत सदस्यांशीही चर्चा करतील. शिवाय, शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी घेण्याचीही शक्यता आहे. उद्या सकाळी अमित शाह अमरनाथचं दर्शन घेतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here