68 पेक्षा अधीक जण जखमी
काबूल – अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये एक शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात जवळपास 34 लोकांचा मृत्यू झाला असून 68 जण जखमी झाले आहेत.
स्थानीक वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवादी पुल-ए-महमूद खान परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये घुसले होते. या ठिकाणी सुरक्षादलाशी त्यांची चकमकही झाली.
यावेळी दहशतवाद्याने पहिल्यांदा त्यांच्या बॉम्बनी भरलेल्या कारचा स्फोट घडविला आणि पुन्हा गोळीबार सुरू केला. या भागात संरक्षण मंत्रालयाची इमारत, खेळाचे मैदान, सूचना आणि संस्कृती मंत्रालयाची एक शाखा आणि घरे आहेत. स्फोटानंतर बऱ्याच अंतरावर आवाज ऐकायला गेला होता. त्यानंतर उडालेला धूरही लांबून दिसत आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही.
सध्या तालिबानी आणि अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळांमध्ये सातव्या टप्प्यातील चर्चा सुरू झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता चर्चेसाठी कतारमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही बाजुंकडून जवळपास दोन दशकांपासून सुरू असलेला संघर्ष संपविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता पर्यंतच्या चर्चांमध्ये तालिबानने अफगाणिस्तान सरकारसोबत चर्चेला नकार दिला आहे.