रिक्षा परवान्यासाठी 2 हजार अर्ज 

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सन 2020 मधील तारीख ऑनलाइन अपॉईंटमेंटमध्ये मिळालेल्या रिक्षाचालकांना सन 2019 च्या अखेरपर्यंत रिक्षापरवाना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील महिन्यापासून यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत 2 हजार 100 जणांनी कार्यालयामध्ये परवान्यासाठी कागदपत्रे सादर केली आहेत.  2 thousand applications for rickshaw license

नवीन रिक्षा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना त्यांची कागदपत्रे प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने अपॉईंटमेंट देण्यात येते. त्यानुसार काही अर्जदारांना थेट पुढील वर्षाची तारीख मिळत आहे. यामुळे रिक्षा परवान्यासाठी महिनोंमहिने वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, आरटीओच्या प्रलंबित अर्जांमध्ये वाढ होणार आहे. याचा विचार करत सन 2020 मधील तारीख मिळालेल्यांना यावर्षीच परवाना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. 2020 ची अपॉईंटमेंट मिळालेल्या अर्जदारांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी सकाळी साडेदहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगमब्रीज येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)