वेल्हे- परिसरात मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पानशेत धरण 100 टक्के भरले आहे. पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत.
वेल्हे तालुका डोंगरी भाग असल्याने डोंगरातून वाहणारे पाणी थेट पानशेत धरणात येते. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरण भागातील कादवे, आंबेगाव बुद्रुक, गिवशी, शिरकोली, माणगाव, पोळे, टेकपोळे, दापसरे, कुर्तवडी, गोंडेखल, भालवडी, कसेडी कोशिमघर, कांबेगी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पानशेत धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने धरणातील सर्व दरवाजे उघडले आहेत.