नारायणगाव- महाराष्ट्र सरकार अल्पसंख्याक विकास विभाग ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत, तसेच ग्रामनिधी अंतर्गत ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने मुस्लीम समाजाच्या कब्रस्थानामधील आरसीसी स्टोअर रूम, स्वच्छता गृह आणि अंतर्गत कॉंक्रिटीकरण, अंतर्गत पथदिवे आणि सुशोभीकरण इत्यादी विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. रमजान ईदचे औचित्य साधून सरपंच योगेश पाटे व ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार यांच्या विषेश प्रयत्नातून नारायणगाव कब्रस्थानामधील विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रम करण्यात आले. यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, संतोष दांगट ,गणेश पाटे ,राजेश बाप्ते ,शिवसेना शहर प्रमुख अनिल खैरे, अनिल दिवटे, ग्रामपंचायत सदस्य व सुन्नी मुस्लीम जमाआत नारायणगावचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव उपस्थित होते.