अवसरी – येथील श्री भैरवनाथ विद्यालय, तांत्रिक व सौ. वनिता विट्ठलराव अभंग ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डी. डी. जाधव, रयत शिक्षण संस्थेचे स्थानिक समितीचे सदस्य शरद शिंदे, कल्याण टेमकर, उद्योजक प्रशांत अभंग, गणपत टेमकर, पर्यवेक्षक दादाभाऊ चत्तर, माजी सरपंच कल्याण शिंदे, नवनाथ शिंदे, बापू ठेंबेकर समवेत दहावीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगदीश गुरव यांनी सूत्रसंचालन केले.