वाडा रस्त्याची दयनीय अवस्था

राजगुरूनगर – राजगुरूनगर-वाडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने रस्त्यावरून वाहन चालवणे जिकरचे झाले आहे. त्यातच सध्या या परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने काही दुचाकीचालक पडलेही आहेत. त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असे म्हणण्याची वेळ स्थानिकावर आली आहे. तरी पावसाळ्यापर्यंततरी हे खड्डे तातडीने बुजवावेत. तसेच पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)