कोंढवा दुर्घटना: आर्किटेकचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला

पुणे – कोंढवा भागातील ऍल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत बांधकाम मजुरांच्या वसाहतीवर (लेबर कॅम्प) कोसळून 15 मजुर ठार झाल्याच्या दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या आर्किटेकचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश तांबोळी यांनी फेटाळला. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्‍यता आहे. सत्र न्यायालयाने या प्रकरणातील तीन बिल्डरांचा जामीन यापूर्वीच फेटाळला आहे.

राजेश जगदीशप्रसाद अगरवाल (वय 27) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार दलिचंद पंकज व्होरा (रा. घोरपडी), सुरेश इंदुलाल शहा (रा. नवी पेठ) , रश्‍मीकांत जयंतीलाल गांधी (रा. मार्केट यार्ड) यांचाही अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विवेक सुनील आगरवाल आणि त्याचा भाऊ विपुल या दोघांना अटक करण्यात आली असून, दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, ऍल्कॉन लॅंडमार्कचे भागीदार जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय 64), सचिन जगदीशप्रसाद अगरवाल (वय 34) या दोघांवर गुन्हा दाखल आहे. राजेश आंनी राजेंद्र दौंडकर ऍड. अमोल जोग यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. राजेश आर्किटेक आहेत.

प्रकल्पासाठी ज्यावेळी जागा पाहिली. त्यावेळी राजेश भागीदार होते. मात्र, त्यांनी 2013 मध्ये भागीदारी कायदेशीरपणे सोडली आहे. महापालिकेलाही याबाबत कळविले आहे. आता त्यांचा स्वतंत्र्य व्यवसाय आहे. त्यामुळे या घडलेल्या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली होती. मात्र, घडलेली घटना गंभीर असल्याचे नमुद करत न्यायालयाने अटकपूर्व फेटाळला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here