बारामतीतील 601 जणांवर कारवाई

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची कारवाई

बारामती- बारामती लोकसभा निवडणूक 2019 शांततेत पार पाडावी यासाठी शहरातील एकूण 601 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.
बारामती शहर पोलिसांनी 432 आरोपींवर चांगल्या वर्तणुकी बाबत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आहे. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बॉंड घेण्यात आलेले आहे. अवैद्य दारू विक्रीचे गुन्हे करणाऱ्या 70 जणांवर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेल्या असून त्याबाबत नोटिसा निघालेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 55 प्रमाणे 12 जणांवर, महाराष्ट्र पोलीस कायदा 56 प्रमाणे 3 जणांवर, महाराष्ट्र पोलीस कायदा 57 प्रमाणे 6 जणांवर असे एकूण 21 जणांना दोन वर्षांकरीता तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

सीआरपीसी 144 (2) प्रमाणे एकूण 153 जणांना नोटिसा निघालेल्या असून 120 जणांना नोटिसा बजावलेल्या आहेत. निवडणूक काळामध्ये तीन दिवसांकरीता 36 जण तडीपार करण्यात आलेले आहेत. सीआरपीसी 149 प्रमाणे 125 नोटिसा बजावल्या आहेत. मालमत्तेच्या गुन्हे करणाऱ्या एकूण 134 जणांवर सीआरपीसी 110 प्रमाणे प्रस्ताव पाठवले आहेत, अशाप्रकारे एकूण 601 व्यक्‍तींवर निवडणूक काळात शांतता राहावी यासाठी कारवाई केलेली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना , बारामती तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील व पोलिसांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)