खडक पोलिसांनी शोधले शेरुला

पुणे,दि.16- खडक पोलिसांनी एका बेपत्ता झालेल्या श्‍वानाचा शोध घेऊन त्याला मालकाच्या ताब्यात सोपवले. बेपत्ता तसेच रस्ता चुकलेल्या लहान मुलांना , ज्येष्ठांना नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्याचे कर्तव्य पोलीस करत असतात. आता मात्र मुक्‍या प्राण्यालाही मालकाच्या ताब्यात सोपवण्याचे कर्तव्य खडक पोलिसांनी पार पाडले.
कासेवाड़ी पोलिस चौकीच्या हद्दितुन सुखिया मेघाराम चौधरी ( 42 , महाकाली स्वीट होम,रा. चमंशाह चौक, कासेवाड़ी, भवानी पेठ) यांचा पाळीव श्‍वान शेरू हा हरवला होता. त्याची तक्रार देण्यासाठी त्या चौकीत आले असता कासेवाड़ी मार्शल पोलीस नाईक गायकवाड़, पोलीस शिपाई पाटेकर यांनी त्याचा रामोशी गेट पोलिस चौकी व कसेवाड़ी चौकी भागात शोध घेतला. त्यांना फोटो प्रमाणे एक कुत्राला काही कुत्री डीवचट असल्याचे मस्जिद भवानी पेठ येथे आढळले . इतर कुत्री हाकलुन लावून तक्रार यांना बोलावून घेऊन वरील कुत्रा त्यांचा शेरू असल्याची खात्री केली . यानंतर त्यांना चौकित आणून ताब्यात दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)