वाघोली- पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, आदींच्या आवाहनास प्रतिसाद देत व वाढता कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वाघोलीतील श्री दत्त स्पोर्टस क्लब यांच्या वतीने यावर्षी मंडप न घालता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार आहे. अशी माहिती मंडळाचे संस्थापक तथा आधारस्तंभ राजेंद्र अण्णा सातव पाटील यांनी दिली.
गणेशोत्सव दरम्यान श्रींची प्राणप्रतिष्ठा करून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. व श्रींची छोटी मूर्ती आणून प्रतिष्ठापना दत्त मंदिर येथे होणार आहे. यावर्षी वाढत्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. सर्व नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
वाघोली येथील वार्ड क्रमांक चारमधील नागरिकांसाठी माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री सातव पाटील, चिराग सातव पाटील यांच्या वतीने मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून दिल्याबददल ग्रामस्थांनी सातव परिवाराचे आभार मानले आहेत.