मंचर – सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आवश्यक मदत प्रांताधिकारी संजय पाटील यांच्याकडे लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे रविवारी (दि. 11) सुपूर्त केली. पूरग्रस्तांसाठी पाणी बॉक्स, बिस्किट, ब्लॅंकेट, साडी, टी-शर्ट, स्वेटर, लहान मुलांचे व मुलींचे कपडे, पोहे, तांदुळ, गहू, साखर, डाळ, मुलांचे शाळेतील दप्तर, अत्यावश्यक औषधे, डायनालॉग इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून स्मोकेलेस स्मार्ट स्टोव्ह, फरसाण आदी साहित्य व भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने रोख रक्कम देण्यात आली आहे.
पुढील काळात शिरुर लोकसभा व शिवसेनेच्या वतीने अजूनही मदत केली जाणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य देविदास दरेकर, तालुकाप्रमुख अरुण गिरे, पंचायत समितीचे सदस्य रविंद्र करंजखेले, सागर काजळे, सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरु, अशोक गव्हाणे, योगेश बाणखेले, मालन थोरात, आबा लांडगे, किसन भालेराव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.