किव्ह – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी रशियाविरोधातील संघर्षादरम्यान जागतिक समुदायाला अधिक सहकार्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे सध्या युरोपच्या दौऱ्यावर असून ब्रुसेल्स येथे नाटोच्या सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांबरोबर त्यांची युक्रेन-रशिया संघर्षासंदर्भात महत्वाची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभुमीवर झेलेन्सकी यांनी जागतिक समुदायाला अधिक मदतीचे आवाहन केले आहे.
युक्रेनमध्ये सुरू असलेले अत्याचार आणि हिंसाचार उघड्या डोळ्यांनी दिसतो आहे. या नागरिकांचे आक्रोश सहज ऐकू येत आहेत. युक्रेन, नागरिक, शांतता आणि सुरक्षितताही महत्वाची आहे, असे झेलेन्सकी यांनी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटले आहे. यावेळी ते अतिशय भावनिक झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
झेलेन्सकी यांनी स्वीडनच्या संसदेला उद्देशून केलेल्या या व्हिडीओ संदेशामध्ये मदतीचे आवाहन केले आहे. झेलेन्सकी यांनी अशाप्रकारे अनेक देशांना मदतीचे आवाहन गेल्या काही दिवसात केले आहे.
युरोपीय संघाने युक्रेनसाठी आणखीन 500दशलक्ष युरो किंतीची लष्करी मदत देऊ केली आहे. नाटोच्या बैठकीमध्ये रशियावर अतिरिक्त निर्बंध घालण्याचा प्रस्ताव बायडेन मांडणार असल्याचेही मानण्यात येते आहे. “जी-7′ देशांच्या नेत्यांबरोबरच युरोपीयन कौन्सिलच्या नेत्यांबरोबरही बायडेन चर्चा करणार आहेत.
रशियाचे मदतीचे जहाज बुडवल्याचा युक्रेनचा दावा…
युद्ध सुरू होऊन आता महिना होत आला आहे. आता युक्रेनच्या शस्त्रसाठ्याला मर्यादा आल्या असाव्यात असे तज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही बाजूंकडून गुरुवारी मोठ्या यशाचा दावा करण्यात आला आहे. रशियाच्या सुरक्षा दलांना मदत सामुग्री पोहोचवण्यासाठी निघालेले एक जहाज बुडवल्याचा दावा युक्रेनच्या नाविक दलाने केला आहे.
तर दुसरीकडे रशियानेही युक्रेनच्या पूर्वेकडील तिझीम नावाचा भूप्रदेश ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. मात्र अनेक बागांमध्ये युक्रेनच्या फोजांनी रशियाच्या सैन्याची कोंडी केली आहे. रशियाचे ध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यासाठी हा एक अनपेक्षित प्रतिकार आहे.