इंदुर – ऑनलाईन खरेदीसाठी सर्वात विश्वासू कंपनी म्हणून अॅमेझॉनकडे पाहिलं जातं. विविध सेलच्या माध्यमातून अॅमेझॉन आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देताना दिसते. मात्र इंदुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका युवकाने अॅमेझॉनवरून विष मागवून आत्महत्या केल्याची घटना घडली. गेल्या महिन्यात या तरुणाचा मृत्यू झाला होता.
मृत मुलाचा मोबाईल तपासल्यानंतर त्याच्या आई-वडिलांच्या ही बाब लक्षात आली. मुलाच्या आईवडिलांनी अॅमेझॉनकडून अशा प्रकारे विष विकण्यावर आक्षेप नोंदवला असून कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली. आदित्य वर्मा अस मृत युवकाचं नाव आहे.
आदित्यने २० जुलै रोजी पहिल्यांदा विष मागवलं होतं. मात्र पेमेंटअभावी ते परत गेलं. त्यानंतर २८ जुलै रोजी त्याने अॅमेझॉनवरून सल्फास नावाचं विष मागवलं. त्याने ते २९ जुलैच्या रात्री पिलं आणि झोपी गेला. आई-वडिलांनी आदित्यला तातडीने रुग्णालयात दाखल केला. मात्र ३० जुलै रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
दरम्यान आदित्याचा मोबाईल त्याच्या घरच्यांना चेक केला. त्यामुळे त्यांना कळलं की, मुलाने अॅमेझॉनवरून विषय मागवलं होतं. त्यानंतर त्यांनी अॅमेझॉन कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली.