पुणे (प्रतिनिधी) : रिक्षात बसून रस्त्यावर थुंकल्याच्या किरकोळ कारणावरून चौदा जणांच्या सराईत टोळीने दोघांना शिवीगाळ आणि बेदम मारहाण करून धारधार हत्यार व दगडांनी रिक्षा, दुचाकी आणि झायलो कार वाहनांच्या काचा फोडल्या. येरवडा येथील सेवक चौकात शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.
करोनामुळे येरवड्यात पोलिसांकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी चालू असतानाही टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केले आहे .
आकाश भातकर, आकाश मिरे, विकी सरवदे, विशाल वाघेल, प्रथमेश सूर्यवंशी, आकाश कानडे, शेखर कुऱ्हाडे, अनुज भालेराव, योगेश खुडे, किरण मिरे, आकाश फुगे, नव्या बागवान, बालाजी सरवदे (सर्व, रा.सेवक चौक,लक्ष्मीनगर, येरवडा) यांच्यावर बेकायदा धारधार हत्यारांनी बाळगणे, दहशत निर्माण करणे, मारहाण करणे आणि राष्ट्रीय आपत्ती कायद्या कलमानुसार गुन्हे दाखल केले आहे. बालजी सरवदे (वय.१९ ) आणि किरण मिरे (२२) यांना अटक करण्यात आली आहे . याप्रकरणी मयूर विष्णू गुंजाळ (वय.२२,रा.शनी आळी ,येरवडा ) याने फिर्याद दिली आहे.