Yash Kataria । आपल्या वडिलोपार्जित उद्योग-व्यवसायाला त्यांच्याप्रमाणेच सांभाळता येणं हि एक मोठी परीक्षाच असते. कधी कधी या परीक्षेत काही जण नापास होतात तर काही जण ही परीक्षा पास होण्यासाठी अपार मेहनत, कष्ट, जिद्द आणि महत्वाचं म्हणजे संयम ठेवतात. अशा लोकांना त्यात यश नक्की मिळते. आजची success story अशाच वडिलोपार्जित व्यवसायाला त्यांच्या एवढ्याच काळजीने सांभाळणाऱ्या तरुण उद्योगपतींची आहे.
यश कटारिया वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी 400 कोटी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी सांभाळत आहे. मध्य प्रदेशातील रतलामसारख्या छोट्या ठिकाणाहून एकेकाळी सुरुवात केलेल्या यशने या कंपनीला देशातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये नेले आहे. कटारिया ग्रुपची स्थापना त्यांच्या आजोबांनी केली होती, पण शिक्षण पूर्ण केल्यानंतर यशने आपल्या पूर्वजांचा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. आज कटारिया ग्रुपच्या त्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत. कटारिया ग्रुप तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, शिक्षण यासह अनेक क्षेत्रात कार्यरत आहे.
यशने रतलाममधून शिक्षण पूर्ण केलं Yash Kataria ।
यशचा जन्म मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले. व्यवसायिक कुटुंबात जन्माला आल्यास अभ्यासाला महत्त्व दिले जात नाही, असा सर्वांचा समज असतो. परंतु त्यांच्या कुटुंबात अभ्यासाबाबत खूप जागरुकता होती, त्यामुळे त्यांनी अभ्यासही मन लावून केला. सुरुवातीच्या शिक्षणानंतर यश ग्रॅज्युएशनसाठी सिंगापूरला गेला. जिथे त्यांनी बॅचलर ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स कोर्स केला. यशला तो एका बिझनेस क्लास फॅमिलीतला असल्याने अभ्यास करून काय होईल, असे कधीच वाटले नव्हते, उलट पुढे जाऊन अभ्यास करण्याचा विचार केला. म्हणून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, तो मास्टर कोर्स करण्यासाठी लंडनला गेला.ज्याठिकाणी त्याने मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.
यशने हा पर्याय निवडला
यशकडे दोन पर्याय होते, एकतर तो कोर्स केल्यानंतर मोठ्या कंपनीत नोकरी मिळवू शकतो किंवा तो आपला वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेऊ शकतो, म्हणून त्याने दुसरा पर्याय निवडला. यशने घरच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना आखली. कटारिया ग्रुपचे काम पाहण्यासाठी ते आले तेव्हा ग्रुपचा फारसा विस्तार झालेला नव्हता. पण आपल्या शिक्षणाचा उपयोग यशने आपल्या व्यवसायासाठी केला. आपल्या नियोजन आणि नवीन कल्पनांच्या जोरावर यशने रिअल इस्टेटपासून ज्वेलरी तंत्रज्ञानापर्यंतचा व्यवसाय नव्या उंचीवर नेला. यश सांगतात की, पारंपारिक व्यवसाय करणारी कंपनी ज्वेलरी आणि टेक्नॉलॉजीमध्ये चांगले काम करू शकेल याची कल्पना कोणीही केली नसेल, पण ते करण्यासाठी यशने खूप मेहनत घेतली.
कशी झाली यशची सुरुवात? Yash Kataria ।
1971 मध्ये त्यांच्या आजोबांनी मध्य प्रदेशातील रतलाम येथून स्टील वायर उत्पादन कंपनी सुरू केली. त्यानंतर कटारिया कुटुंब या व्यवसायात गुंतले. स्टील वायर तयार करण्यापासून ते मार्केटिंगपर्यंतचे संपूर्ण काम कटारिया कुटुंबातील लोक करत होते. दरम्यान, कुटुंबियांसोबत यशने आपल्या नवीन संकल्पना कंपनीच्या फायद्यासाठी वापरल्या. त्यामुळे हळूहळू या कंपनीने स्टील वायर्स तसेच केबल्स कंडक्टर, एलआरपीसी स्टँड इत्यादींच्या निर्मितीच्या व्यवसायातही प्रवेश केला.
यानंतर कंपनीने ॲल्युमिनियम कंडक्टर, रिअल इस्टेट, सोन्याचे दागिने, वाऱ्यापासून वीज निर्मिती इत्यादी व्यवसायातही प्रवेश केला. या समूहाने देशात उड्डाणपूल, मेट्रो आदी अनेक प्रकल्प उभारले. सध्या कंपनीचा टर्नओव्हर 400 कोटींच्या जवळपास आहे. यासाठी यश यांनीदेखील आपल्या शिक्षणाचा उपयोग करून घेतला. आज यश एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत. एवढंच नाही तर ते देशातील तरुणांसाठी एक प्रेरणा बनले आहेत.