WPL Live Cricket Score, GG vs UPW Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगच्या पाच संघांमधील प्लेऑफची लढत सुरू झाली आहे. मुंबई आणि दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचले असून, आता लढत तिसऱ्या स्थानासाठी आहे. आरसीबी, यूपी आणि गुजरात यांच्यात स्पर्धा आहे.
महिला प्रीमियर लीग 2024 चा 18 वा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला जात आहे.
गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सांगितले की त्यांचा संघ एका बदलासह यूपीविरुद्ध मैदानात उतरेल. आता गेल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यात गुजरातला यश येते की पुन्हा एकदा निराशेला सामोरे जावे लागणार हे सामना झाल्यानंतरच कळेल.
GG vs UPW : दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे…
गुजरात जायंट्स : लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फोबी लिचफिल्ड, डेलन हेमलता, ऍशले गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, मन्नत कश्यप, तनुजा कंवर, मेघना सिंग, शबनम एमडी शकील.
The Lineups are here 🙌
What do you make of the two teams that will take the field tonight? 🤔
Live 💻📱 https://t.co/WHTYqs2Bd5#TATAWPL | #GGvUPW pic.twitter.com/zUG9NhUNa9
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 11, 2024
यूपी वॉरियर्स : एलिसा हिली (कर्णधार आणि यष्टीरक्षक), किरण नवगिरे, चमारी अटापट्टू, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, सायमा ठाकूर, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी.
दरम्यान, आज या लीगचा 18वा सामना जर यूपीने हा जिंकला तर ते आठ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचतील. मात्र, आरसीबीचा नेट रन रेट यूपीपेक्षा चांगला आहे. जर संघाने पुढील सामना जिंकला तर ते यूपीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढू शकतात. अशा स्थितीत यूपीला आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल, त्यामुळे त्यांचा नेट रनरेट सुधारू शकतो.