WPL Live Cricket Score, DC vs UPW Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला यूपी वॉरियर्सविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अलिसा हिलीच्या संघाने मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाचा एका धावेने पराभूत करून मागील पराभवाचा बदला घेतला आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी यूपी वॉरियर्सने रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 1 धावेने पराभव केला. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 10 धावांची गरज होती, पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर दिल्लीला 5 चेंडूत 4 धावा हव्या होत्या, मात्र सलग 3 विकेट पडल्यामुळे यूपीने हा रोमांचक सामना 1 धावांनी जिंकला.
WHAT. A. MATCH! 🙌
That’s a surreal comeback from the @UPWarriorz as they clinch a 1-run win💜
Scorecard 💻📱https://t.co/HW6TQgqctC#TATAWPL | #DCvUPW pic.twitter.com/5r0D2PlR1P
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 8, 2024
युपी संघाने विजयासाठी दिलेल्या 139 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. भरात असलेली शफाली वर्मा 15 धावांवर बाद झाली. त्यावेळी कर्मधार मेग लेनिंगने एलिस केप्सीच्या साथीत डाव सावरताना संघाचे अर्धशतक फलकावर लावले. केप्सी देखील निराशाजनक खेळ करत बाद झाली. तिने 15 धावा केल्या.
दरम्यान लेनिंगने आक्रमक फटकेबाजी करत आपले अर्धशतक साकार केले. तिच संघाचा विजय साकार करमार असे वाटत असतानाच बाद झाली. तिने 46 चेंडूत 12 चौकारांसह 60 धावांची खेळी केली व संघाचे शतकही फलकावर लावले. यावेळी खेळपट्टीवर जेमिमा रॉड्रीक्स व अनाबेल सदरलॅंड खेळत होत्या. त्यांना विजयासाठी 30 चेंडूत 39 धावांची गरज होती. येथून सामना प्रत्क षटकात बाजी पलटणारा ठरला.
जेस जॉन्सनने आक्रमक खेळी केली. याचवेळी राधाव यादवनेहीडमक दाखवली व सामना 2 चेंडूत 2 धावा असा रंगतदार स्थितीत आला. 20 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर तितास सिद्धू बाद झाली व अखेरच्या षटकापर्यंत रंगलेला हासामना युपी संघाने अवघ्या 1 धावेने जिंकला.
WPL 2024 ( #DCvUPW Match 15 ) : दीप्ती शर्माचे अर्धशतक; यूपीचे दिल्लीसमोर माफक आव्हान…
तत्पूर्वी, दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत आठ गडी गमावून 138 धावा केल्या होत्या. ॲलिसा हेलीच्या नेतृत्वाखालील संघाची सुरुवात विशेष झाली नाही. यूपीची स्फोटक फलंदाज किरण नवगिरे दुसऱ्याच षटकात बाद झाली. तिला तीतस साधूने क्लीन बोल्ड केले. किरणने केवळ पाच धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार हेली 29 धावा करून बाद झाली. सात चेंडूंच्या आत संघाला तिसरा धक्का ताहिया मॅकग्राच्या रूपाने बसला. तिला अरुंधती रेड्डीने बाद केले. मॅकग्रा तीन धावा काढून बाद झाली.
यूपीची फलंदाजीची फळी दिल्लीच्या गोलंदाजीपुढे झुंजताना दिसत होती. ग्रेस हॅरिसने 14, श्वेता सेहरावतने चार, पूनम खेमनारने एक, सोफी एक्लेस्टोनने आठ धावा केल्या. यूपीला आठवा धक्का दीप्ती शर्माच्या रूपाने बसला जिने 48 चेंडूत 59 धावा केल्या. 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शिखा पांडेने तिला आपला बळी बनवले. तर सायमा ठाकूर आणि गौहर सुलताना अनुक्रमे पाच आणि एक धावा करून नाबाद राहिल्या.
दिल्लीकडून गोलंदाजीत तीतस साधू आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर शिखा, अरुंधती, जेस जोनासन आणि ॲलिस कॅप्सीने प्रत्येकी एक विकेट घेतली.