मुंबई – आयपीएलप्रमाणेच महिला प्रीमियर लीगच्या(डब्लूपीएल) दुसऱ्या हंगामासाठी देखील डिसेंबर महिन्यात लिलाव होणार आहे. मुंबईत ९ डिसेंबरला होणाऱ्या या लिलावात एकूण १६५ महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम हा २०२४ च्या फेब्रुवारी – मार्च महिन्यात होणार आहे.
बीसीसीआयने आज एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले. त्यात ते म्हटले, ‘महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण १६५ खेळाडूंपैकी १०४ खेळाडू या भारतीय आहेत तर ६१ खेळाडू या विदेशी आहेत. तर १५ खेळाडू या असोसिएट देशांशी सल्लग्नित आहेत. एकूण ५६ कॅप्ट तर १०९ अनकॅप्ट खेळाडू यंदाच्या लिलावात उतरणार आहेत.’
यंदाच्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात पाच संघांसाठी जास्तीत जास्त ३० स्लॉट आहेत. यातील ९ जागा या विदेशी खेळाडूंसाठी आहेत. वेस्ट इंडीजची अष्टपैलू खेळाडू डीएन्ड्रा डॉट्टीनला गुजरात जायंट्स ६० लाखाला खरेदी केले होते. मात्र वादग्रस्तरित्या वैद्यकीय कारणांमुळे तिला वगण्यात आले आहे. तिच्या जागी ५० लाख रुपये मोजून ऑस्ट्रेलियाच्या कीम ग्राथला गुजरातने आपल्या संघात घेतले. मात्र तिला देखील हंगाम संपल्यानंतर तिला गुजरातने रिलीज केले आहे.
महिला प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरिअर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यासाठी ३० स्लॉट रिकामे आहेत. त्यातील ९ स्लॉट हे विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. या पाच संघांनी मिळून एकूण ६० खेळाडू रिटेन केले आहेत. त्यात २१ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
IPL 2024 : न्यूझीलंडच्या ‘रचिन रवींद्र’ची ‘आयपीएल’ लिलावसाठी Base Prize झाली निश्चित…
कोणाकडे किती पर्स शिल्लक?
गुजरात जायंट्सच्या पर्समध्ये सर्वाधिक पैसे शिल्लक आहेत. त्यांना यंदाच्या लिलावात १० स्लॉट भरायचे आहेत. तर दिल्ली यंदाच्या लिलावात २.२५ कोटी रूपये पर्समध्ये घेऊन सहभागी होणार आहे. त्यांना तीन जागा भरायच्या आहेत. गतविजेत्या मुंबईच्या पर्समध्ये २.१ कोटी रूपये आहेत. त्यांना पाच स्लॉट भरायचे आहेत. रॉयल चॅलेंजर बंगळुरू ३.३५ कोटी रूपयात सात खेळाडू भरणार आहे. युपी वॉरियर्सला ४ कोटी रूपयांत पाच जागा भरायच्या आहेत.