चिंताजनक.! राहाता तालुक्यात करोनाचा उद्रेक; बुधवारी आढळले तब्बल ‘एवढे’ रुग्ण

राहाता – नगर शहरापाठोपाठ ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. राहाता तालुक्यात बुधवारी 229 करोनाबाधित आढळल्याने सक्रीय रुग्णांचा आकडा 750 झाल्याने चिंता वाढली आहे. नगर शहरापाठोपाठ या तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याने करोनाचा धोका अधिक वाढला आहे.
शिर्डीतील कोविड सेंटर पूर्ण भरले असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड शिल्लक नाही.

ऑक्सिजनची सुविधा असलेले 65 बेड पूर्णपणे भरलेले आहेत. प्रशासनाने या गोष्टीकडे वेळेस लक्ष देऊन तत्काळ विलगीकरण कक्ष बंद करून त्याठिकाणी कोविड सेंटरची सुरू करून रुग्णांना उपचार सुविधा देणे गरजेचे आहे. शिर्डी हे जगाच्या नकाशावरील दुसर्‍या क्रमांकाचे तीर्थक्षेत्र समजले जाते. या ठिकाणी लाखो साईभक्त साई दर्शनासाठी दररोज येतात.

मात्र या ठिकाणी साईबाबा संस्थान रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी कमकूवत ठरत आहे. शिर्डी येथे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे . परंतु तिथे नेहमीच डॉक्टर व कर्मचारी यांची कमतरता जाणवते. रुग्णांना उपचार घेण्यासाठी डॉक्टर वेळेवर हजर नसतात. कोट्यवधी रुपये खर्चाची आधुनिक मशनरी अनेकदा बंद अवस्थेत आढळून येते. राहाता ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांची चाचणी करण्यासाठी कर्मचार्‍यांची कमतरता आहे.

चार खासगी हॉस्पिटलला उपचाराची परवानगी
शिर्डी येथे असलेल्या कोविड केअर सेंटरच्या बेडची क्षमता आता दुप्पट करण्यात आली. तर चार खासगी हॉस्पिटलला कोविड रुग्णांच्या उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार तत्काळ मिळावे, यासाठी बेडची क्षमता वाढविण्यास सांगितले असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.