केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांचे प्रतिपादन
जिनिव्हा- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी म्हणाले की, आफ्रिकेबरोबर विशेषत: कापसाच्या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या विकासाची भागीदारी करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. आज जिनेव्हा येथे होणाऱ्या भागीदार परिषदेत आफ्रिकेसाठी कॉटन टेक्निकल असिस्टन्स प्रोग्राम (टीएपी) च्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभाची भारत घोषणा करणार आहे.
पाच वर्षांच्या दुसऱ्या टप्प्यात हा कार्यक्रम आकार आणि कव्हरेजमध्ये वाढविला जाईल आणि माली, घाना, टोगो, झांबिया आणि टांझानिया या पाच अतिरिक्त देशांमध्ये तो सादर केला जाईल. कॉटन टीएपी कार्यक्रमात आता सी 4 (बेनिन, बुर्किना फासो, चाड आणि माली) यासह 11 आफ्रिकन देशांचा समावेश असेल.
बेनिन, बुर्किना फासो, चाड, मलावी, नायजेरिया आणि युगांडा या 2012 ते 2018 या कालावधीत भारताने आफ्रिकन देशांमध्ये कापसासाठी तांत्रिक सहाय्य कार्यक्रम (टीएपी) राबविला.
शेतकरी, वैज्ञानिक, सरकारी अधिकारी आणि उद्योग प्रतिनिधींच्या प्रशिक्षण व क्षमता-वाढीद्वारे आणि आफ्रिकेतील कापूस मूल्य साखळीतील कृषी व कापड या दोन्ही भागाला बळकटी देण्यासाठी भारत अर्थसंकल्पित सहभाग घेत आहे, असेही स्मृती झुबिन इराणी पुढे म्हणाल्या.
जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक भारत आहे, म्हणून जागतिक कापूस दिनाचे समर्थन देत जागतिक बाजारपेठ म्हणून कापसाचे महत्त्व ओळखण्याची संधी आणि त्याही महत्त्वाचे म्हणजे लाखो लघु व सीमांत शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचे स्रोत म्हणून स्मृती झुबिन इराणी यांनी आज जिनेव्हा येथे जागतिक कापूस दिनाच्या पहिल्या सत्रात विकसनशील देशांना सांगितले.
महात्मा गांधी यांना जागतिक कापूस दिनाचे “आयकॉन’ म्हणून निवडले गेले आहे आणि पहिल्या जागतिक कापूस दिनाचे औचित्य साधून भारत “डब्ल्यूटीओ’ला महात्मा गांधींच्या चरख्याची प्रतिकृती देईल. भारताच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पिट्टा रामुलू यांनी चरख्याचे थेट प्रात्यक्षिक आयोजित केले असल्याचेही त्यांनी सांगितले.