शिरूर -शहरातील पाषाणमळा जवळील दत्त मंदिर यांच्यामध्ये असणाऱ्या इमारतीमध्ये चाळीस वर्षीय कंपनी कामगार पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे.
तसेच येथील एका कामगाराचा मुलगा बाधित झाला आहे. तो कामगार पुणे येथील केईएम हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. सोमवारी (दि. 29) रात्री उशिरा त्याचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.