पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव असलेल्या वल्लभनगर आगारातील ‘इन गेट़ अर्थात बसचे प्रवेशद्वार कामासाठी बंद करण्यात आले आहे. पुढील दहा दिवस हे गेट बंद रहाणार असून महामार्गावरील प्रवेशद्वाराचा वापर करण्यात येत आहे. मात्र, अनेकांना ते माहीत नसल्याने फेरा पडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
महामेट्रोकडून गेल्या सुमारे वर्षभरापासून वल्लभनगर आगाराचे काम करण्यात येत आहे. त्यात आगारात काँक्रीटीकरण करण्यात आले. आगारात प्रवेश करण्यासाठी ‘इन गेट’ आहे. तर, महामार्गावरच्या बाजूला असलेल्या द्वाराचा वापर हा मुंबईहून येणाऱया व जाणाऱया एसटी बससाठी होत होता.
मात्र, मध्यंतरी महामार्गावरसमोर असलेल्या द्वारासमोर भरधाव येणाऱया वाहनांमुळे अपघात होत असल्याने हे द्वार बंद करण्यात आले होते. अनेक महिने बंद राहिल्यानंतर हे द्वार आता खुले करण्यात आले आहे.
‘इन गेट’ परिसरात काम सुरू असल्याने आगारात येणाऱया सर्व वाहनांना तसेच प्रवाशांना या द्वाराचा वापर करता येत नाही. परिणामी आगारात येणारे प्रवासी आणि त्यांना सोडविण्यासाठी येणाऱया प्रत्येकाला महामर्गाच्या समोर असेलल्या प्रवेशद्वाराचा वापर करावा लागत आहे. परिणामी मोठा वळसा घालून नागरिकांना यावे लागत आहे.
तसेच सध्या होळीच्या सणासाठी कोकणी बांधव गावाला जाण्यासाठी गर्दी करत आहेत. तसेच आगारातूनही एसटी बसचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, बुकिंगसाठी येणाऱया प्रवाशांना गोंधळलेली परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे हे काम लवकर संपवावे, असे नागरिकाचे म्हणणे आहे.
आगारात काँक्रीटीकऱणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ‘इन गेट’ बंद करण्यात आले आहे. पुढील दहा दिवस काँक्रीटीकरणाचे काम सुरू रहाणार आहे. माहितीसाठी वाँचमन तेथे आहे. तर, महामार्गावरील द्वाराचा वापर सध्या करण्यात येत आहे. प्रवासी आणि नागरिकांनी आगारात येण्यासाठी महामार्गावरील द्वाराचा वापर करावा. – संजय वाळवे, आगारप्रमुख, वल्लभनगर