पुणे : 29 आणि 30 मार्च ला 42 गायकांनी वंडर बुक ग्रुप वर्ल्ड रेकॉर्ड केले. हार्मनी इव्हेंट्स आणि प्रख्यात गायिका आरती दीक्षित यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमांमध्ये 42 गायक सहभागी झाले होते. पुणे, मुंबई,औरंगाबाद, नगर अशा ठिकाणांहून येथे गायक आले होते.
वर्ल्ड रेकॉर्डची थीम 24 तासात 250 गाणी अशी होती. 75 पार्श्वगायक, 75 पार्श्वगायिका आणि 75 संगीतकार यांची गाणी सादर करण्यात आली. सर्व सहभागी गायक कलाकारांचे अभिनंदन व आभार आरती दीक्षित यांनी मानले.