पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – हार्मोनी इव्हेंट्स आणि प्रख्यात गायिका आरती दीक्षित यांचे ग्रुप वर्ल्ड रेकॉर्ड ४२ गायकांचे वंडर बुक वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. २९ आणि ३० मार्च ला ४२ गायकांनी वंडर बुक ग्रुप वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण केले.
हार्मनी इव्हेंट्स आणि प्रख्यात गायिका आरती दीक्षित यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांमध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद, नगर येथून ४२ गायक सहभागी झाले. २४ तासांत २५० गाणी अशी वर्ल्ड रेकॉर्ड ची थीम होती.
७५ पार्श्वगायक, ७५ पार्श्वगायिका आणि ७५ संगीतकार यांची गाणी सादर करण्यात आली. सर्व सहभागी गायक कलाकारांचे अभिनंदन आणि आभार आरती दीक्षित यांनी मानले.