भोर, (प्रतिनिधी) – भोर येथे प्रेरणा प्रतिष्ठानचे वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी वाॅकेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात २५ ते ३५ युवती गट,३६ ते ५० मध्यम गट आणि ५१ ते ८० वरीष्ठ गटाचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेमध्ये एकूण १५१ महिलांनी सहभाग घेतला. त्यापैकी युवतींगटात ५२, मध्यम गटामध्ये – ६३ व ज्येष्ठ गटामध्ये ३६ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.सर्वात जेष्ठ महिला ७५ वर्षीय होत्या. महिलांमध्ये स्पर्धेसाठी प्रचंड उत्साह दिसत होता.
भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार व पोलीस उपनिरीक्षक शीला खोत यांनी झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. स्पर्धेचे एकूण अनेर ३ किमी अंतर होते.माजी सैनिक संघटनेचे भोर तालुका अध्यक्ष नानासाहेब समगीर, माजी नगरसेविका सोनम मोहिते, रोटरी क्लबचे सेक्रेटरी नारायण वाघ, इस्माईल शेख, चंद्रकांत पारवे, शैलजा सावंत, नीला शेठ, नंदा जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कुटुंबासाठी वर्षभर राबणारी महिला स्वत:साठी वेळ देऊ शकत नाही संसारातील दैनंदिनीची चौकट मोडून स्वताच्या आरोग्याकडे महिलांनी लक्ष द्यावे व दक्ष राहावे, असे प्रतिपादन प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अँड. जयश्री शिंदे यांनी प्रास्ताविकात केले.
स्पर्धेसाठी भोर तालुका माजी सैनिक संघटना, आर आर विद्यालय अनंतराव थोपटे महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थी तसेच ओर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांनी सहकार्य केले. स्पर्धा प्रमुख विजया शिंदे, अनिता फडणीस, डॉ. अरूंधती सोनवणे, योगिता ओसवाल शिक्षा गुमास्ते, सुनंदा गांधी, मंगल जाधव, वेदिका सातपुते स्पर्धा यशस्वी केली.
युवती गटात भाग्यश्री लोंढे
युवती गट प्रथम भाग्यश्री लोंढे, द्वितीय रेश्मा कांबळे, तृतीय ज्योती कुटे, उत्तेजनार्थ रेखा किर्वे, प्रियांका घोरपडे, मध्यम गट प्रथम सीमा पाटील, द्वितीय जयश्री काळे, तृतीय दर विद्या कुमकर. उत्तेजनार्थ संध्या झगडे, अँड. अश्विनी कुलकर्णी. वरिष्ठ गट प्रथम जयश्री खळदकर, द्वितीय किरण शेळके , तृतीय प्रभा किंद्रे. उत्तेजनार्थ- मेघा आगटे, सीमा जराड.