जबलपूर/नागपूर – महाराष्ट्रातील नागपुरातील भाजप नेत्या सना खान यांची जबलपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी नागपूर आणि जबलपूर पोलिसांनी आरोपी आणि सनाचा कथित पती अमित साहू उर्फ पप्पू याला अटक केली आहे. पप्पू साहूने हत्येची कबुली दिली असून हत्येनंतर सनाचा मृतदेह नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. पोलीस आता मृतदेहाचा शोध घेत आहेत.
आरोपी अमित साहू उर्फ पप्पू याला अन्य दोघांसह नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील घोडा बाजार परिसरातून अटक करण्यात आली. सना खान ही नागपुरातील भाजपच्या अल्पसंख्याक सेलची पदाधिकारी होती आणि 1 ऑगस्टपासून बेपत्ता होती.
नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दावा केला की, या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहू हा हिना (वय 34) हिला ओळखत होता आणि तिनेच सनाचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली होती. मात्र, सनाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नागपुरातील सना खान ही भाजप नेता आठवडाभरापासून बेपत्ता असल्याची बातमी होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती मध्य प्रदेशातील जबलपूर येथील तिच्या बिझनेस पार्टनरकडे गेली होती. मात्र त्यानंतर काहीच कळले नव्हते.