मुंबई – अभिनेत्री सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडले जात आहे. मात्र नुकतेच साराने एक मुलाखतीत तिला नवरा म्हणून कसा मुलगा हवा याबाबत स्पष्ट सांगितले आहे. सध्या तिने दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
एका मुलाखती दरम्यान साराला ‘तुझी आजी शर्मिला टागोर यांच्या पावलावर पाऊल टाकत तु पण क्रिकेटरशी लग्न करणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली की, ‘ ती व्यक्ती अभिनेता, क्रिकेटर, व्यावसायिक किंवा डॉक्टर काहीही असू द्या काही हरकत नाही. पण त्या व्यक्तीने मानसिक आणि बौद्धिक पातळीवर माझ्याशी जुळून घेतले पाहिजे. एखादा व्यक्ती कोण आहे किंवा काय करतो यापेक्षा माझ्यासाठी ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे”, असे स्पष्ट मत साराने व्यक्त केले.
पुढे तिला ‘भारतीय टीमधील कोणत्या क्रिकेटरला ती डेट करताय का?’ असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावर तिने ‘ज्या व्यक्तीसोबत मला संपूर्ण आयुष्य काढायचं आहे त्याला ती अजून भेटलेली नाही,’ असे उत्तर दिले. दरम्यान, कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांनी इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरची सर्वत्र चर्चा होती.
मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर आता सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल एकमेंकाना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच शुभमन आणि साराने एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे वृत्त समोर आले होते.