टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी तिच्या लग्नामुळे सतत चर्चेत आहे. देवोलिनाने अलीकडेच तिचा प्रियकर शाहनवाज शेखसोबत लग्न केल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, देवोलिना लग्नाच्या दिवसापर्यंत वराबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवला.
बहुतेकांना वाटत होते की, ती तिचा ‘साथ निभाना साथिया’चा को-स्टार विशाल सिंगसोबत लग्न करत आहे, पण अभिनेत्रीने अचानक तिच्या पतीची ओळख करून देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले. देवोलिना भट्टाचार्जी आता मुस्लीम पुरुषाशी लग्न केल्यामुळे ट्रोलच्या निशाण्यावर आहे.
देवोलीनाला शाहनवाज उर्फ शोनूशी झालेल्या लग्नाबद्दल युजर्स विचित्र प्रश्न विचारत आहेत. मात्र, नुकतेच देवोलीनाने एका ट्विटर युजरला सडेतोड उत्तर दिले, ज्याने अभिनेत्रीला ‘तुझी मुले हिंदू होतील की मुस्लिम?’ मात्र, आता युजरने त्याचे ट्विट डिलीट केले आहे. पण, हे ट्विट अभिनेत्रीच्या नजरेपासून लपून राहू शकले नाही. देवोलीनाने युजरला चांगलेच फैलावर घेत सर्व ट्रोलला उत्तर दिले.
ट्रोलवर प्रतिक्रिया देताना देवोलीनाने याला विषारी म्हटले आहे. ती लिहिते, ‘माझी मुले हिंदू होतील की मुस्लिम, हे विचारणारे तुम्ही कोण? आणि जेव्हा तुम्हाला मुलांची एवढी काळजी वाटते, अनेक अनाथाश्रम आहेत, तेव्हा जा, दत्तक घ्या आणि स्वतःनुसार धर्म आणि नाव ठरवा. माझे पती, माझे मूल, माझा धर्म, माझे नियम. तू कोण आहेस? #विषारी’
देवोलीनाच्या लग्नाच्या फोटोंवर प्रतिक्रिया देतानाही अनेक युजर्सनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. साथ निभाना साथिया अभिनेत्रीच्या लग्नाच्या फोटोंवर टिप्पणी करताना, एकाने ते अलीकडील श्रद्धा वॉकर प्रकरणाशी जोडले, ज्याला अभिनेत्रीने प्रत्युत्तर दिले आणि वापरकर्त्याला ‘आजारी मनाचा’ म्हटले.