नोरा फतेही सोबत रोमांस करणार विकी कौशल

बॉलीवूडमध्ये अभिनेत्री नोरा फतेही एक प्रसिद्ध डान्सर म्हणून ओळखली जाते. तिने “दिलबर’ आणि “कमरिया’ यासारख्या गाण्यांमधून आपल्या डांसिंग स्किल्सचा जलवा दाखविलेला आहे. एवढेच नव्हे, तर सलमान खानच्या “भारत’मधील नोराच्या अभिनयाचीही सर्वत्र स्तुती होत आहे. आता लवकरच ती अभिनेता विकी कौशलसोबत रोमांस करताना झळकणार आहे. पण हा रोमांस कोणत्या चित्रपटात नसून एका गाण्यात आहे.

त्याचे असे आहे की, भूषण कुमार यांच्या एका म्यूझिक व्हिडिओमध्ये नोरा आणि विकी हे रोमांस करणार आहेत. हा म्यझिक व्हिडिओ शिमला येथे शूट करण्यात येणार आहे. या गाण्यातील विशेष बाब म्हणजे, यात विकी कौशलची फुल फ्लेजेड रोमांटिक इमेज झळकणार आहे.

याबाबत एका मुलाखतीत नोरा म्हणाली, हा म्यूझिक व्हिडिओ माझयाकडे “दिलबर’ गाणे प्रदर्शित झाल्यानंतरच आला होता. त्यावेळी या गाण्यासाठी एका अभिनेत्याचा शोध सुरू असल्याचे निर्मात्यांनी मला सांगितले होते. हे गाणे माझ्या मागील गाण्यांपेक्षा एकदम वेगळे आहे. यात फक्‍त डान्सच नव्हे, तर त्यासोबत अभिनय करण्याचीही मला संधी मिळणार आहे. हे गाणे एका विवाहित जोडप्यावर आधारित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.