बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 33 !
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवलेल्या “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे सदस्यांमध्ये बरेच वादविवाद, ओढाताण झाली.
या कार्याच्या संचालिका मीनल आणि मीरामध्ये देखील बरेच वाद झाले. आज सदस्यांमधील हे भांडण आणि धक्काबुक्की वेगळ्याच टोकाला जाणार आहे. कार्या दरम्यानचे राडे संपायचे नावचं घेत नाहीये असे दिसून येतं आहे.
याच टास्कमुळे आज मीनल आणि विशालमध्ये देखील भांडण होणार आहे. कोण आहे Fair आणि कोण आहे Unfair यावरून दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली. दिवसेंदिवस घरातील समीकरण, नाती बदलताना दिसतं आहेत. नक्की कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगणे कठीण झाले आहे.
मीनल याचबाबतीत बोलायला आणि तिचा मुद्दा मांडायला विशालकडे गेली असता विशालचा कुठेतरी मीनलच्या सांगण्यावर अजिबात विश्वास नाहीये असे दिसून आले. मीनल विशालला म्हणाली, जेव्हा पहिला टास्क होता ना जेवढे पण होते बॉक्स तू ओरडत होता ते सगळे ओरडत होते माझं म्हणण काय होतं जे बरोबर आहे.
ते बरोबर आहे झाला ना योग्य तो निर्णय… त्यावर तृप्ती देसाई म्हणाल्या आमचे चेपलेले बॉक्स का रिजेक्ट केले पहिल्या फेरीत ? त्यावर मीनल म्हणाली मी विशालशी बोलते आहे. मी दोन criteria ठेवले होते जे ओले होते पहिले ते काढले नंतर दोन वरती होते ते काढले. मी चेपलेले बॉक्स नाही काढले.
त्यावर विशाल मीनलला म्हणाला तूच काढले चेपलेले बॉक्स. त्यावर मीनल त्याला वारंवार सांगायचा प्रयत्न करत होती मी नाही काढले. तुम्ही unfair खेळताय. माझ्यावर विश्वास नाही का तुमचा ? विशाल म्हणाला नाहीये.