मुंबई – बॉलीवूडमधील सुपरस्टार आणि अजूनही अविवाहित असलेल्या सलमान खानचे समीकरण आतापर्यंत अनेक हिरॉईनबरोबर जोडले गेले आहे. नेहमी सलमान खानच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच सोशलवर रंगताना दिसतात.
View this post on Instagram
असे असले तरी यावेळी मात्र सोशलवर त्याच्या लग्नाची चर्चा न होता त्याच्या एकूणच संपत्तीचे काय करणार यावर चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
सध्या सोशलवर त्याचा एक जुना व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये सलमानची जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीत सलमानने त्याच्या पश्चात त्याच्या संपत्तीचं काय करणार हे सांगितलं आहे.
तुझ्या पश्चात म्हणजेच मृत्यूनंतर तू तुझ्या संपत्तीचं काय करणार? असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. त्यावर सलमानचं उत्तर ऐकून अनेक जण खूश झाले.
सलमान म्हणाला,”मी लग्न केलं काय आणि नाही केलं काय.. माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीमधील अर्धा वाटा मी एका ट्रस्टला दान करणार आहे. तसंच जर मी लग्न केलंच नाही तर माझी संपूर्ण संपत्ती त्या ट्रस्टच्या नावाने केली जाईल”
दरम्यान,सलमान खानच्या जीवनावर बनत असलेल्या “बियॉंड द स्टार- सलमान खान’ या डॉक्युड्रामाचे काम सध्या जोरात सुरू आहे. सलमान खानच्या जीवनातील आतापर्यंत न ऐकलेल्या गोष्टी या डॉक्युड्रामामध्ये बघायला मिळणार आहेत. या डॉक्युड्रामामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार, निर्माते, दिग्दर्शक आणि सलमानशी संबंधित अनेक जणांना सहभागी करून घेतले जाणार आहे.