Narendra Modi’s government | Mallikarjun Kharge : केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार हे अल्मतातील आणि चुकुन सत्तेवर आलेले सरकार आहे. हे सरकार कधीही कोसळू शकते असे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
मोदींना सरकार स्थापन करण्यासाठी जनतेचा कौल मिळालेलाच नाहीे, हे केवळ चुकुन सत्तेवर आलेले सरकार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रात भाजपला स्वबळावरचे बहुमत गमवावे लागले आहे. आज या पक्षाचे सरकार तेलगुदेसम (१६), जेडीयु (१२), शिवसेना शिंदे गट (७), आणि लोकजनशक्ती -रामविलास (५) या पक्षांच्या पाठिंब्यावर तरले आहे.
या आघाडीत कोणत्याही मुद्द्यावरून कधीही धुसफूस सुरू हेाऊ शकते. त्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खर्गे यांनी हे प्रतिपादन केले.