लंडन – आधुनिक जगामध्ये आहार आणि विहार यामध्ये विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे. संपूर्ण चांगले आरोग्य लाभण्यासाठी कशा प्रकारचा आहार असावा याबाबत विविध प्रकारचे संशोधनही सुरू आहे. आता डॉक्टरांनी दिलेल्या नव्या माहितीप्रमाणे माणसाच्या आहारामध्ये जर इंद्रधनुष्याच्या रंगातील सर्व रंगांच्या घटकांचा समावेश असेल तर हा आहार अतिशय लाभकारक होतो.
या आहार पद्धतीला इंग्रजीमध्ये रेनबो डाएट पद्धती म्हटले जाते इंद्रधनुष्यात ज्याप्रमाणे सात रंग असतात त्याप्रमाणे दैनंदिन आहारामध्ये सात रंगांच्या फळे किंवा इतर घटकांचा समावेश असावा असे ही आहार पद्धती सांगते. विविध रंगांच्या आहारामधील एंटीऑक्सीडेंटमुळे मानवी शरीरातील पेशींचे ऱ्हास होणे थांबते असे या डॉक्टरचे म्हणणे आहे.
लाल रंगांचे पदार्थांमध्ये स्ट्रॉबेरी डाळिंब सफरचंद यासारखी फळे टोमॅटो सिमला मिरची या भाज्या शरीराला अतिशय फायदेशीर ठरतात हे पदार्थ मानवी शरीराला कर्करोगापासून दूर ठेवतात.
नारंगी रंगाचे पदार्थ डोळ्यांचे आरोग्य सुधारता त्यामुळे संत्री-मोसंबी गाजर भोपळा यासारख्या पदार्थांचा समावेश होतो
पिवळ्या रंगाच्या वस्तू आहारात असल्यामुळे पचनसंस्था सुधारते यामध्ये पपई लिंबू अननस आंबा मक्याचे कणीस यासारख्या घटकांचा समावेश होतो.
हिरव्या भाज्यामध्ये ऑंटीअक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या शरीराला सर्वात जास्त फायदेशीर ठरतात सर्व प्रकारच्या पालेभाज्या भेंडी कोबी मटारसारख्या फळभाज्या शरीराला अतिशय उपयुक्त ठरतात.
निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या खाद्य पदार्थांमुळे मानवी मेंदूची क्षमता वाढते यामध्ये वांगी जांभूळ ब्लॅक बेरी ब्लूबेरी यासारख्या फळांचा समावेश होतो.
पांढऱ्या रंगाच्या खाद्य घटकांमुळे हृदयाची क्षमता सुधारते आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवले जाते यामध्ये कांदा लसूण आले मशरूम केळी या खाद्य घटकांचा समावेश होतो.
सामान्य नागरिकांनी या इंद्रधनुष्य आहार पद्धतीचा अवलंब केला तर ते अनेक रोगांना आपल्यापासून दूर ठेवू शकतात असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे