नवी दिल्ली -नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक आजार टाळण्यासाठी सुरक्षित सेक्ससाठी लोक जोडीदाराबरोबर शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करतात. आज मार्केट मध्ये बऱ्याच प्रकारेचे फेव्हर्ड आणि डॉटेड कंडोम मिळतात.
मात्र कंडोम बनवण्यात प्राण्यांच्या प्रोटीन केसिनचा वापर रबर सौम्य करण्यासाठी केला जातो. त्यामुळे अनेक जन कंडोम वापरण्यास नकार देतात. त्यावर आता पर्याय म्हणून शाकाहारी कंडोम बाजारात उपलब्ध झाले आहे. शाकाहारी कंडोम म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल.
बीबीसी या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, कंडोम तयार करण्यासाठी पूर्वी प्राण्यांच्या प्रोटीन केसिनचा वापर केला जात होता मात्र आता शाकाहारी आणि पर्यावरणपूरक लोकांना या शाकाहारी कंडोम मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे.
हे कंडोम तयार करण्यासाठी झाडांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक वंगणाचा वापर होतो. झाडांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक वंगण वापरली आहे. दरम्यान या शाकाहारी कंडोमची गेल्या काही वर्षात वापर वाढला असून बाजारातही शाकाहारी कंडोमची मागणी वाढली.