नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका मुस्लीम डोसा विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुथरा येथील विकास बाजारचा हा व्हिडिओ असून डोसा विक्रेत्याने आपल्या दुकानाला श्रीनाथ असे हिंदू देवतेचे नाव दिले होते.. देविराज पंडित नावाच्या एका फेसबुक युजर्संने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, जमावाकडून डोसा विक्रेत्याच्या दुकानाची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून येते.
मथुरा येथील विकास बाजारातील ही घटना असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ शेअर करणारा देविराज पंडित हाच या गर्दीचे नेतृत्व करत असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओत एक व्यक्ती यह श्रीनाथ डोसा है… असे म्हणत असून दुसरा व्यक्ती मुस्लीम डोसा विक्रेत्याला त्याचं नाव विचारत आहे. तू हिंदू नाव असलेल्या श्रीनाथजींच्या नावाने आपलं दुकान का चालवतो?, असा प्रश्न डोसा विक्रेत्याला विचारला जात आहे.
A Muslim Dosa vendor was attacked by a mob of right wing viglantes in Vikas Bazar, Mathura. The shop was vandalized by the mob and the man was threatened with FIR for waging "Economic Jihad." The mob was chanting, "Krishna Bhakton ab yudh karo, Mathura ko bhi Shudh karo." pic.twitter.com/F7IYpqDI3O
— Alishan Jafri | अलीशान (@asfreeasjafri) August 27, 2021
त्यावेळी, आणखी एक व्यक्ती डोसा विक्रेत्याला समजावून सांगताना दिसत आहे. त्यामध्ये, तुम्ही हिंदू नाव लावून का दुकाना चालवता, ते नाव पाहूनच हिंदू धर्मीय लोक इच्छा नसतानाही येथे खायला येतात, असे त्याने म्हटले आहे.
थाना कोतवाली क्षेत्रान्तर्गत विकास मार्केट में श्रीनाथ डोसा कार्नर के नामकरण को लेकर कुछ अज्ञात व्यक्तियो द्वारा आपत्तिजनक शब्दो का प्रयोग करने के सम्बन्ध में क्षेत्राधिकारी नगर द्वारा दी गयी बाइट। pic.twitter.com/aRzzHZnip0
— MATHURA POLICE (@mathurapolice) August 27, 2021
दरम्यान, या घटनेप्रकरणी मथुरा पोलिसांनी माहिती दिली आहे. डोसा विक्रेत्याच्या दुकानाच्या नावावरुन हा वाद झाला आहे. काही लोकांनी डोसा विक्रेत्याला शिवीगाळ केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या, पोलीस तपास सुरू असून संबंधित व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. तसेच, संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.