कार्ला – मावळ तालुक्यातील जीवनदानी असणारी इंद्रायणी नदीची राघव नर्मदा परिक्रमा आयोजित पुण्य सलिला श्री इंद्रायणी निघाली असून ह्या परिक्रमेत सहभागी झालेल्या वारकर्यांचे कार्ल्यात स्वागत करण्यात आले.
नागफणी कुरवंडे उगमस्थानापासून परत फिरणार्या पायी चालणार्या वारकर्यांचे व पालखीचे स्वागत कार्ला फाटा दुर्गा परमेश्वरी मंदिरात हभप प्रकाश महाराज जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत मोरे, उपसरपंच किरण हुलावळे, सदस्य अभिषेक जाधव, अक्षय शिर्के,तुकाराम हुलावळे यांनी केले.
राघव नर्मदा कृपांकीत हभप नवनाथ महाराज आहेर व हभप सीमाताई आहेर मैया यांंच्या मार्गदर्शनाखाली ही परिक्रमा सुरु आहे. इंद्रायणी मातेच्या प्रतिमेचा अनावरण सोहळा व श्री क्षेत्र आळंदी येथे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सद्गुरू वै.कुंभार गुरुजी यांंच्या हस्ते पार पडला.
यावेळी शंतिब्रम्ह गुरुवर्य हभप मारोती महाराज कुर्हेकर, गुरुवर्य हभप श्री पंडित महाराज क्षीरसागर, हभप गुरुवर्य डॉ. विकासानंद महाराज मिसळ, हभप महंत अर्जुन महाराज तनपुरे, हभप संदिपान हसेगावकर, हभप महादेव महाराज राऊत, हभप उत्तम महाराज गुंड, नर्मदा कृपांकीत हभप नवनाथ महाराज आहेर आदी उपस्थित होते.
या वारी दरम्यान थांबवण्यात येणार्या विविध ठिकाणी ह्या परिक्रमेतील वारकरी प्रवचनरुपी सेवा देत पर्यावरणाचे सरंक्षण तसेच नदी प्रदूषण कसे रोखावे याबाबत माहिती दिले जात आहे.