मुंबई : राज्यातील कलाक्षेत्रात कार्यरत कलाकारांना विविध समस्या भेडसावत असून शासन त्यावर वेगाने मार्ग काढेल असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथीगृहात ज्येष्ठ कलाकार वैजयंती कुलकर्णी आपटे, दिग्दर्शक जब्बार पटेल तसेच अभिनेत्री अलका कुबल यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वतंत्र सदिच्छा भेटी घेतल्या. यावेळी विविध विषयांसंदर्भात या कलाकारांसोबत चर्चा झाली.
मंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश देत या समस्यांवर कालबद्ध पद्धतीने काम करण्यास सांगितले. या सर्व समस्यांचे लवकर निराकरण करण्यात येईल. राज्य शासन कलाक्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता – मंत्री मुनगंटीवार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतली. अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले, हा चित्रपट माहितीने अचूक व दर्जाने उत्तम होण्यासाठी राज्य शासन योग्य ती मदत करेल. पुढच्या वर्षी 14 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.