प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -समान पाणी योजनेअंतर्गत पाण्याचे ऑडीट करण्यासाठी महापालिकेकडून लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीतील वानवडी इएसआर व हाय सर्व्हिस टाकी तसेच पर्वती जलकेंद्राच्या अखत्याऱ्यातील पर्वती “एचएलआर’ येथे व एसएनडीटी “एसएलआर’ येथे फ्लो मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पर्वती, बिबवेवाडी, सहकारनगर, शिवाजीनगर, कोथरूड, सेनापती बापट रस्ता यांसह अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद असणार आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी स्पष्ट केले.
पाणी बंद असलेला भाग
वानवडी इएसआर व हाय सर्व्हिस टाकी ः वानवडी गाव, फातिमानगर, पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचा संपूर्ण भाग, संपूर्ण लष्कर भाग, सोलापूर रोडच्या दोन्ही बाजू रामटेकडी चौकापर्यंत, सोपान बाग, उदय बाग, डोबरवाडी कवडेमळा संपूर्ण परिसर, बी. टी. कवडे रोड व प्रभाग क्रमांक 25.पर्वती एचएलआर टाकीः पर्वती गाव, सहकारनगर, तावरे कॉलनी, आदर्शनगर, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, वाळवेकरनगर, संतनगर, नव महाराज सोसायटी, सारंग सोसायटी, मित्रमंडळ कॉलनी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, एसबीआय कॉलनी, अरण्येश्वर, कोंढवा, बिबवेवाडी, अप्पर-बिबवेवाडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी ओटा, महेश सोसायटी, कात्रज कोंढवा, गंगाधाम परिसर, डायस प्लॉट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क, संदेशनगर, मीरा सोसायटी, एसटी कॉलनी, स्वारगेट, संभाजीनगर, धनकवडी.
सेमीनरी जीएसआर टाकी ः अप्पर, इंदिरानगर, कोंढवा खुर्द, शिवनेरीनगर, कोंढवा गावठाण, स.नं. 354 , मोरे चाळ, गव्हाणे चाळ, भाग्योदयनगर, मीठानगर, कुमार पृथ्वी, साईबाबानगर, स. नं. 42,43 युनिटी पार्क, ज्ञानेश्वर नगर, सवेरा पार्क परिसर.
एसएनडीटी एचएलआर टाकी ः शिवाजीनगर परिसर, भांडारकर रोड, बीएमसीसी रोड, रेव्हेन्यू कॉलनी, गोखलेनगर, मॉर्डन कॉलनी, वैदुवाडी, पत्रकारनगर, पांडवनगर, भोसलेनगर, खैरेवाडी, जनवाडी, सेनापती बापट रोड, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, तेजसनगर, कोथरूड गावठाण, जोग शाळेजवळील भाग, भेलकेनगर, गुजरात कॉलनी, सुतार दवाखान्यामागील परिसर, गाडवे कॉलनी, परमहंसनगर, सुतारदरा, रामबाग, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, गुरुराज सोसायटी, इन्कमटॅक्स कॉलनी, वनाज परिसर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, जय भवानी नगर, किष्किंदानगर, एमआयटी कॉलेज परिसर, प्रभाग 31 चा वडार वस्ती, स्टेट बॅंक नगर, हॅप्पी कॉलनी, मेघदूत सोसायटी आणि परिसर