वारजे वन उद्यान सेवा संस्थेचा उपक्रम
वारजे : उन्हाळा सुरू झाला की पशू पक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते याचा विचार करून चांदणी चौक ते एनडीए रस्त्यावरील वन क्षेत्र परिसरातील पशू पक्षांचे उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल होऊ नयेत यासाठी वारजे वन उद्यान सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही पाण्याची सोय करण्यात आली आहे.
महेश बराटे मित्र परिवाराच्या सलग ९ वर्ष हा उपक्रम राबवला जात असून यंदाचे हे १० वे वर्ष आहे. मागील वर्षी एक लाख लिटर म्हणजेच १० टँकर ची सोय करण्यात आली होती. आणि याही वर्षी तेवढ्याच पाण्याची सोय करणार असल्याचे महेश बराटे यांनी सांगितले. या वेळी मनिष बराटे, संतोष घोसाळे, शंकर बोडके, मनोज काळे, सुधीर मोरे, अमिर शेख, विकास पाटील, गणेश दळवी उपस्थित होते.
उन्हाळ्यात पशू पक्षांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत यासाठी वराजेतील हे तरुण एकत्र आले असून सातत्याने न चुकता दरवर्षी त्यांच्याकडून पाण्याची सोय केली जात आहे.एनडीए रस्त्यावरील वन क्षेत्र परिसर मध्ये विविध ठिकाणी असणाऱ्या खोल खड्ड्यांमध्ये आठवड्यातून एकदा टँकरने पाणी आणून सोडले जाते. त्यामुळे या वन क्षेत्र परिसरात असणाऱ्या पशू पक्षांची उन्हाळ्यात चांगली सोय झाली आहे. पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत हा उपक्रम राबवला जातो. यंदा करोना चे संकट असल्याने हा उपक्रम राबवला जाणार का, या परिसरातील पशू पक्षांना या उन्हाळ्यात पाणी मिळणार का हा प्रश्न होता मात्र या तरुणांनी सर्व खबरदारी घेत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हा उपक्रम घ्यायचा ठरल्याने कोरोना चे जरी सावट असले तरी पशू पक्षांचे पाण्यासाठी हाल होणार नाहीत एवढे मात्र नक्की आसेच म्हणावे लागेल.